Skip to main content

शेवटचे पूर्ण वार्तापत्र

इथे आपण मागील वार्तापत्राचा पूर्ण अंक PDF स्वरूपात पाहू शकाल

स्वरूपयोग वार्तापत्र स्वामीजींनी सन १९९७ सालापासून सुरू केले. सुरुवातीला मासिक आणि अलीकडे त्रैमासिक या स्वरूपात हा अंक मराठी भाषेतून छापील आणि pdf पद्धतीने संस्थेकडून प्रकाशित केला जातो.

स्वामीजींचे लेख, त्यांचा राष्ट्रीयत्व आणि शास्त्रशुद्ध मध्यवर्ती अध्यात्ममार्गावर असलेला मार्मिक भर आणि सर्व साधकांच्या अंतःकरणाला मोहून टाकणारी भाषाशैली हे या वार्तापत्राचे विशेष आकर्षण आहे. काही महत्त्वाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी आणि त्यामागचे प्रखर राष्ट्रप्रेम, ज्ञानेश्वरीतील सौंदर्य, दासबोधातील निवडक ओव्या आणि तप्त चित्ताला भक्तीच्या ओलाव्याने आल्हाद देणारे सरस रामायण, यांसारख्या विषयांवर स्वामींच्या विशेष लेखमाला यात वाचायला आणि अभ्यासायला मिळतात.

याचबरोबर नवीन पिढी घडावी, युवकांची आध्यात्मिक आणि राष्ट्रीयत्व धारणांची विचार बैठक पक्की व्हावी, आध्यात्मिक उन्नतीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास घडावा या दृष्टिकोनातून अनेक उत्कृष्ठ युवा स्वाध्याय, प्रश्न उत्तरे आणि त्यावर स्वामींचे मार्गदर्शन वार्तापत्रात अनुभवास येते. सर्व साधकांनी या वार्तापत्राचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.