स्वरूपयोगाश्रम


 शिष्या येकांती बैसावे | स्वरूपी विश्रांतीस जावे |
 तेणे गुणे दृढावे | परमार्थ हा || दासबोध

 स्वरूपी रहाणे सोयीचे होण्यासाठी, साधकांना एकांतवास मिळून साधनेमध्ये तत्परता साधण्यासाठी स्वरूपयोगाश्रम साकारला आहे. साधकांच्या निवासी व्यवस्थेची काळजी घेत साधना, स्वाध्याय आणि उपासना या गोष्टींना चालना देणे हा स्वरूपयोगाश्रमाचा उद्देश आहे. रूटीन जीवनापासून, 'नेटवर्कींग' पासून थोडं दूर - 'स्व' च्या जवळ जायचं असेल तर स्वरूपयोगाश्रम तुम्हाला मदत करेल. स्वरूपी राहाणे हा स्वधर्म जगण्यासाठी इथे तुम्हाला साधना - स्वाध्यायाची स्फूर्ती मिळेल.