स्वामी माधवानंद: अल्प परिचय
(Please scroll down for English)

स्वामी माधवानंद हे आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराज व पुढे स्वामी-स्वरूपानांद (पावस) यांच्याकडून स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी आहेत.

पूर्वायुष्यात स्वामी म्हणजे, डॉ. माधव नगरकर यांनी पुण्यातील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून वनस्पतीशास्त्रातील कवकशास्त्र किंवा मायकॉलॉजी या विषयात लायकेन्स या वनस्पती वर्गावर डॉ. परशुराम पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. त्यावर त्यांनी पुणे विद्याठाची Ph. D. डिग्री प्राप्त झाली. १९८७-८८ मध्ये डॉ. नगरकरांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डि. सी. येथील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट येथे, पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळवून लायकेन्स या विषयात डॉ. मेसन हेल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. पुढे त्यांनी ब्रिटिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रि, लंडन आणि म्युनिक बोटॅनिकल गार्डन्स, जर्मनी येथेही या विषयात काम केले. १९८९ पासून पुढे त्यांनी मश्रुम कल्टिवेशन या विषयात संशोधन केले.

तरुण वयापासून ते नित्य ध्यान-साधना करीत आले आहेत. संशोधनपर वृत्ती आणि साधना यातून ध्यानयोग प्रक्रियेचा अभ्यास करून तिच्या सूक्ष्म अंतर्स्थितीचे त्यांनी आकलन करून घेतले. गीता, योगसूत्रे आणि संतवाङ्‌मयात जी आत्मयोग प्रक्रिया सांगितली आहे, तिचे मध्यवर्ती सूत्र काय? हे मर्म जाणून तिचा अवलंब करुन त्यांत सांगितलेला अनुभव त्यांनी प्रथम स्वत:मधे घेतला. त्यावरून गीतेतील ध्यानयोग हा सर्वात स्पष्ट, स्वच्छ, काहीही गूढ नसलेला असा आहे हा त्यांचा निष्कर्ष आहे. या ध्यानयोग प्रक्रियेचे मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कार्याचे सूत्र आहे. हा ध्यानयोग कोणालाही आचरता येतो, त्यातून व्यावहारिक फायदे म्हणजे चित्ताची स्थिरता, एकाग्रता आणि सृजनक्षमता म्हणजे creativity वाढणे. या गोष्टी सर्वांना आणि विशेषत: युवकांना जीवनात अत्यंत उपयोगी आहेत आणि भारतीय अध्यात्मशास्त्राचा तर हा गाभाच आहे म्हणून स्वामीजी ह्या शास्त्राचे विवरण करीत असतात.

स्वामींच्या कार्याचे दुसरे महत्त्वाचे अंग म्हणजे आपण ज्या छोट्या - मोठ्या उपासना करतो, जे काही स्तोत्र-मंत्र म्हणतो, त्यांचे अर्थ आणि उद्देश जाणून घेऊन ते म्हणावेत आणि उपासना करावी यावर त्यांचा भर आहे. उदाहरणार्थ गायत्री मंत्र हा self-conciousness शी बुद्धी संबंधित करण्यासाठी आहे. कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्याचा उद्देश तिथे असणार्‍या आज्ञाचक्राला स्पर्श व्हावा हा आहे, देवळात घंटा वाजवून आपण देवाला वर्दि देत नसतो तर स्वत:ला दर्शनासाठी alert करीत असतो. आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींमागचा अर्थ कोणलाही पटेल या पद्धतीने भाषासौंदर्यासह ते व्यक्‍त करीत असतात.

कोणताही गूढवाद निर्माण न करणे, व्यक्‍तिपूजा, स्तुती यांचे वातावरण निर्माण न होऊ देणे, मैत्रीपूर्ण, खेळकर विनोदी प्रसन्नशैली यामुळे येथील विविध शहरांमधील आणि परदेशातील अमेरीका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया येथील युवक स्वामींकडे आकृष्ट झाले आहेत. ते विविध केंद्रे चालवतात. अमेरिकेतले एक युवा केंद्रे तर टेलिफोनिक कॉन्फरन्सिंग स्वरूपात चालते.

या केंद्रात युवक-युवती गीता-ज्ञानेश्वरी दासबोध तसेच राष्ट्र्पुरुषांच्या जीवनावर १५ ते २० मिनीते आपले स्वाध्याय प्रेझेंट करतात. देशातल्या - परदेशातल्या युवकांची विषय आणि वक्‍त्तृत्त्व यांची तयारी स्वामी करून घेतात. थोर व्यक्‍तिमत्वांच्या अभ्यासातून आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा विकास हे यामागचे सूत्र आहे म्हणून त्यात विवेकानंद, लोकमान्य टिळक, सावरकर याबरोबर आईन्स्टाईन आणि बाबा आमटे यांवरही स्वाध्याय होतात. युवांच्या गायन-वादन क्षमतांना युवा-केंद्रे व कार्यक्रमांत चांगलाच वाव दिला जातो. युवां कलाकारांचे अप्रतिम गायन आणि स्वामींचे विवरण हा 'भावतरंग कार्यक्रम' देशात आणि परदेशात चांगलाच प्रतिसाद मिळवतो. दोन वेळा हा कार्यक्रम अमेरिकेतील BMM मध्येही झाला यावरून हे लक्षात येईल. स्वामींच्या अमेरिका-कॉनडा दौर्‍यात, शहरांमध्ये, ध्यान-प्रबोधन आणि शक्य तेथे भावतरंग हे कार्यक्रम असतात.

स्वामी दरवर्षी युवा शिबिरे घेतात. त्यात एका शिबिरात ३०० ते ५०० युवा भाग घेतात. युवा केंद्रे व शिबिरातले कार्यक्रम यांचे संयोजन आणि संचलन युवाच करतात. किमान ७०% प्रेझेंटेशन युवांचं असतं. यात ग्रुप डिस्कशन पासून दिंडीत नाचण्यापर्यंत विविध कार्यक्रमात युवा रंगून जातात त्याप्रमाणे ध्यानातही सहज एक तास बसू शकतात हे फार पाहण्यासारखे आहे.

शिबिरांची स्थानेसुद्धा आकर्षक असतात. गेल्या वर्षी शिबिर ग्वाल्हेरला झालं. त्यापूर्वी कन्याकुमारीला विवेकानंदपूरम येथे तर शिबिराला साडे-सातशेजण होते. रत्नागिरी, गोवा, नागपूर, पन्हाळगडावर या शिबिरात तर आपला आवडता नट अतुल कुलकर्णी कलेमागे कष्ट किती आणि प्रेझेंटेशन मागचं प्रिपरेशन कसं असतं हे सांगून युवकांना प्रेरणा देऊन गेला.

स्वामींच्या latest CDs लोकमान्य टिळक, 'रामकृष्ण - विवेकानंद आणि आपण' या प्रेरणादायी आहेत. गीतेच्या अध्यायाचे विवरण ग्रंथ, ध्यानयोग, 'दिव्यत्त्वाचा संस्पर्श' हे तुकाराम महाराज दर्शन - युवा संवाद - ज्यात युवांच्या प्रश्नांची युवांच्या भाषेत उत्तरं दिली आहेत, तसेच सरस रामायणातल्या सुंदर उपकथांचा रस चाखायला हवा असा आहे. शेगावच्या गजानज महाराजांच्या चमत्कारापेक्षा व्यक्‍तिमत्त्व आणि प्रबोधनाला जास्त महत्त्व दिलेला त्यांचा सर्वात अलिकडचा ग्रंथ आहे. सद्ध्या रामरक्षा - विवरण ग्रंथ चालला आहे. अनेक प्रकाशने आहेत पण एकूण हे लिखाण कशा प्रकारचं आहे हे व्यक्‍त केलं.

स्वामींची प्रवचने सर्वत्र प्रिय होण्याचं कारण त्यातला आल्हाददायक मोकळेपणा, शास्त्रीय बैठक याबरोबरच वाङ्‌मय सौंदर्य प्रकट करणारी त्यांची शैली. यात गीता-ज्ञानेश्वरीच्या सौंदर्यापासून कबीरांसह विविध संत एवढेच नव्हे तर मोरोपंत आणि केकावली हे ही विषय येतात. संतांप्रमाणेच टिळक-सावरकर हे ही येतात.

आज स्वामी आणि साधक डोंगरगाव, मुळशी येथील गिरीवनात स्वरूपयोगाश्रम उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राचीन ऋषींच्या आश्रमांच्या धारणा प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न यशस्वी होवो.


Swami Madhavanand - a short introduction

Swami Madhavanand is one of the lineal successors of a branch of Nāthasampradāya (tradition) centered on dhyāna yoga (science of meditation); a tradition originating from Ādinātha (Lord Shiva), coming through Jñāneśvara Mahārāja, and in recent times via Swami Svarūpānanda(Pawas) up to Swami Mādhavanātha (Pune).

Prior to his spiritual undertaking, Swamiji, meaning Dr. Madhav Nagarkar, did research in Mycology on the class of plant organisms called Lichens, at the Agharkar Research Institute in Pune under the guidance of Dr. Parshuram Patwardhan. For this work, he was granted a Ph.D. degree from Pune University. During 1987-88, having gained a post-doctoral fellowship at the Smithsonian Institute in Washington, D.C., USA, Dr. Nagarkar did research in the field of Lichens under the guidance of Dr. Mason Hale. Subsequently, he worked in the same field at the British Museum of Natural History, London, and Munich Botanical Gardens, Germany, as well. From 1989 onwards, he did research in the field of mushroom cultivation. Right from his youth, he has been doing dhyāna-sādhanā (meditation practice) regularly. By making a study of the dhyāna yoga process through his research bent of mind and steady practice, he has gained discernment of its subtle inner states. The Ātma yoga(Self-realization) process that is given in the Gītā, YōgaSūtras, and works of saints; what is its central key? Grasping this pith and resorting to it, he has first realized within himself the experience enunciated therein. From that, his conclusion is that the dhyāna yoga in the Gītā is the clearest, cleanest, and contains nothing mysterious whatsoever. To provide guidance in this dhyāna yoga practice, is the central theme of his work. This dhyāna yogacan be practiced by anyone. Practical benefits therefrom would be increase in steadiness of mind, concentration, and creativity. All these things are extremely beneficial to all, especially the youth; and are nothing less than the core itself of the Indian spiritual science. Therefore, Swamiji has been engaged in the exposition of this science. Another important facet of Swamiji’s work is to place emphasis on doing upāsanā (regular spiritual practice)after getting to know the intent and meaning of whatever minor or major upāsanās we perform, whatever stotras-mantras (hymns and sacred formulae) we regularly recite. For example, the Gāyatrīmantra is for connecting the intellect with Self-consciousness. The intent of applying gandha(sandalwood pigment spot) or kuṅkūṃ (a powder preparation for women)on the forehead, is that a touch should be made to the ājñāchakra (a yogic spot at the center of the forehead) located there. By ringing the bell within a temple, we are not giving a notice of our arrival to the deity; but rather alerting ourselves for the darśana (reverential beholding of thedeity). Aided by the beauty of his language, he has been expressing the meaning behind features of our culture in a way that is easy to accept for anyone.

Not encouraging any sort of occultism; not allowing an atmosphere of personality-worship or eulogy to develop; friendly, playful, humorous, glad-hearted style; because of these, youth from various cities here (in India), and from abroad USA, England and Australia, have been attracted to Swamiji. They operate various centers. In the USA, one center even runs in the form of telephone conferencing. In these centers, young men and womenpresent15-20 minute self-studies on Gītā-Jñānēśvarī, Dāsabōdha, as well as on lives of national figures. Swamiji gets the local-overseas youth prepared in the subject matter as well as elocution. Development of own personality through the study of great personalities; this is the principle behind this. Hence self-studies are done on Vivēkānanda, Lōkamānya Tiḷaka, Sāvarkar,along with Einstein and Bābā Āmtē also. The vocal and instrumental music talents of the youth get quite a bit of exposure in the youth centers and programs. Exceptional vocals by the young artists and Swamiji’s discourse on the hymns-this ‘bhāvataranga’ program earns indeed a fine response locally and abroad. This program was performed twice in the BMM in the USA; from this, the aforesaid can be gathered. During Swamiji’s USA-Canada tours, at the city stops, dhyāna-instruction, and where possible Bhāvataranga, are there.

Every year, Swamiji conducts youth camps. In these, 300 to 500 youth participate in a single camp. Planning and management of the programs in the youth centers and camps is done by the youth themselves. A minimum of 70% of the presentation is from the youth. In these, the youth are captivated in the various programs from group discussions to dancing in the dindī (a procession with drums, cymbals, etc.); and likewise can sit for meditation too for an hour easily. This is very much worth seeing.

The locations of the camps too are attractive. Last year (2011), the camp was at Gwalior. Before that, inVivēkānandapuram atKanyakumari however, there were 750 for the camp. In the camps at Ratnagiri, Goa, Nagpur, Panhalgad, our favorite actor Atul Kulkarni came and left after giving inspiration to the youth; having talked of how much labor is behind a performing art, and what kind of preparation is behind a presentation. Swamiji’s latest CDs Lōkamānya Tiḷaka, ‘Rāmakṛṣṇa-Vivēkānanda and us’ are inspiring. Expository works on the Gītā chapters, dhyāna yoga, a revealing of Tukārām Mahārāja ‘divyatvācāsaṃsparśa’ (Communion with Divinity), dialog with youth in which questions from the youth are answered in the language of the youth; likewise worthy of being tasted is the rasa (sweetness) of the beautiful side-stories in sarasa (sap-laden) Rāmāyaṇa. His most recent work is one giving greater emphasis to personality and instruction, rather than miracles, of Gajānana Mahārāja of Shegaon. Currently, the Rāmarakṣā (hymn of praise to Śrīrāma) exposition work is in preparation. There are many publications, but overall what type of writing this is, has been expressed.

The reasons forSwamiji’s discourses becoming popular everywhere are, delightful openness therein, a scientific approach, and right along with that his style highlighting the beauty of the underlying literature.In these are encompassed topics, from the beauty of Gītā-Jñānēśvarī, along with Kabir the various saints; not just these but Moropanta and his kēkāvalī as well. Just like the saints, Tiḷaka-Sāvarkarare included as well. Today, Swamiji and the devotees are endeavoring to establish Swaroopyogashram in Girivan at Dongargoan, Mulashi (near Pune). May this effort to bring to reality the concepts of the āśramas (hermitages) of ancient ṛṣis (sages) bear success.

© All rights reserved | Swaroopyog Pratishthan | Last Modified - 16-Sep-2018 13:36