Swaroopyog Pratishthan ● स्वरूपयोग प्रतिष्ठान ● || श्री || ● SYP:V11.8 

गुरुपौर्णिमा निवेदन
दरवर्षी गुरुपौर्णिमेदरम्यान आपण आपापल्या गावी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करतो. त्यात धून, अभंग, मनोगते, स्वामींचे आशीर्वचन आणि गुरुपूजन असे कार्यक्रम असतात. याही वर्षी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम परगावच्या साधकांसकट सर्वांसाठी पुणे शहरात करणार आहोत.

मागील वर्षी २൦१७ मध्ये स्वामींची प्रकृती ठीक नसल्याने ते परगावी जाऊ शकले नाहीत. याही वर्षी स्वामींची प्रकृती परगावचे दौरे करण्याइतकी चांगली नाही. तरी सर्व साधकांच्या भावना लक्षात घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरू स्वामींचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत आणि गुरूपूजन करता यावे ह्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वारदिनांकवेळस्थळकार्यक्रमाचे स्वरूप
रविवार १, ८, १५ जुलै सकाळी ९:३० ते ११:३०कर्वे नगर, अलंकार सोसायटी, प्लॉट नं. ४६, तेजोनिधी सद्भक्त श्री. चंद्रचूड यांचे बंगल्यात.स्वामींचे प्रबोधन व गुरुपूजन होईल
बुधवार ४, ११, १८, २५ जुलै दुपारी ४:३० ते ६:०० कर्वे नगर, अलंकार सोसायटी, प्लॉट नं. ४६, तेजोनिधी सद्भक्त श्री. चंद्रचूड यांचे बंगल्यात. स्वामींचे प्रबोधन व गुरुपूजन होईल
विशेष कार्यक्रम
रविवार २२ जुलै सकाळी ९:३० ते ११:३० प्रतिज्ञा मंगल कार्यालय, कर्वे नगर (गुरुपौर्णिमा कार्यक्रम - स्वामींचे प्रबोधन, गुरुपूजन, अभंग गायन इत्यादिंसह होईल
शुक्रवार २७ जुलै सकाळी ९:३० ते ११:३० शैलेश सभागृह, तेजोनिधी समोर, कर्वे नगर स्वामींचे प्रबोधन व गुरुपूजन होईल
© All rights reserved | Swaroopyog Pratishthan | Last Updated on: 17-Aug-2016